झाईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांचे सागर कवच अभियान

अच्युत पाटील
बुधवार, 4 एप्रिल 2018

बोर्डी - घोलवड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बुधवार दिनांक 4 व गुरूवार दिनांक 5 एप्रिल रोजी सागर कवच अभियान राबविण्यात येत आहे.झाई सागरी पोलिस तपासणी बोरीगव नाका, येथे नाकाबंदी करण्यात आली असुन, गुजरात महाराष्ट्र राज्यातून येणऱ्या जाणाऱ्या वहानांची कसून तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

सगरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल समजल्या जाणाऱ्या झाई व चिखले गावाच्या समुद्र किनऱ्यावर चोख पोलिस बंदोबस्तठेवण्यात आला आहे. यात महिला पोलिस देखील सक्षभागी झाले आहेत. पालघर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घोलवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी दुर्गेश शेलार आदी पोलिस कर्मचारी सागर सुरक्षा कवच अभियानात सहभागी झाले आहेत.

Web Title: Police's Sea Shield campaign on the zai beach