कल्याणमधील 'त्या' प्रकरणाला राजकीय वळण 

Political angle emerges in scuffle at Kalyan
Political angle emerges in scuffle at Kalyan

कल्याण : गेल्या काही दिवसात कल्याण पूर्वे परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. 3 जानेवारी रोजी पिसावली परिसरात जमिनीच्या वादावरून झालेल्या बाचाबाचीत सफाई कामगार मयुर मसने हे गंभीर जखमी झाले होते. हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच एक नगरसेवक आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असून आम्हाला धमकावत असल्याचा आरोप मसने कुटुंबियांनी केला आहे. मात्र  हे सर्व आरोप पोलीस  आणि संबंधित नगरसेवकाने फेटाळले आहे.

3 जानेवारी रोजी रात्री घराच्या दिशेने जात असताना मनीष पाटील  व त्याच्या चार साथीदारांनी आपल्याला अडवून शिवीगाळ करत धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची तक्रार मयूर मसने यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली होती. तर मनीष पाटील यांची आई प्रतिभा पाटील यांनीही मसनेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

रात्रीच्या वेळी मयूर याने घराच्या दरवाजावर लाथा मारल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने मनीष वर हल्ला केला. हा प्रकार सोडवण्यासाठी  गेला असता माझ्या बोटालाही गंभीर जखमी झाली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

या घटनेत मयूर यांना झालेली मारहाणीच्या जखमा गंभीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मनीष हा नगरसेवक कुणाल पाटील यांचा समर्थक असल्याने त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मयुर मसने व त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच कुणाल पाटील यांच्याकडूनही आपल्यावर केस मागे घेण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कुणाल पाटील यांनी मीरा आणि एम्स रुग्णालयात येऊन दमदाटी केली असून येथील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. तसेच भविष्यात आमच्या कुटुंबाची जीवतहानी होऊ शकते अशा आशयाचा पत्र पोलीस उपायुक्तांना मसने कुटुंबियांनी पाठवले आहे.

त्यामुळे दोन कुटूंबातील जमिनीच्या वादाला राजकीय वळण लागले आहे. आता मानपाडा पोलीस या घटनेचा कसा तपास करतात ते पाहावे लागेल. 

मसने आणि पाटील हे नातेवाईक असून यांच्यात वडिलोपार्जित जमिनीच्या मुद्द्यावरुन कोर्टात केस सुरू आहे. याअगोदर त्यांचे कोणतेही वाद पोलीस स्टेशन पर्यंत आले नाही. आमच्यावर कोणाचा दबाव नसून तपास योग्यरीत्या सुरू आहे. तसेच मनीष यालाही  जखम झाली असल्याने तो रुग्णालयात दाखल होता. गुरुवारी त्याला डिस्चार्ज  मिळाला असून त्याला अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणात परस्पराविरोधात  गुन्हे दाखल करण्यात आले असून मयूर च्या जखमा जास्त गंभीर आहे. 
- गजानन काब्दुले , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे 

या प्रकरणाशी माझा संबंध नसून हा त्यांच्या आपापसातला वाद आहे. सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यात काही तथ्य नाही. यात कोणीही राजकारण करू नये. 
- कुणाल पाटील, नगरसेवक 

कुणाल पाटील यांचा या प्रकरणात काही संबंध नाही, असे जबरदस्तीने माझ्याकडून त्यांच्या समर्थकांनी वधवून घेत ते रेकोर्ड केले. आरोपीना वाचविण्यासाठी आमच्यावर पाटील हे दबाव टाकत असून कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीसही  दबावाखाली काम करत आहेत 
- मयुर मसने, तक्रारदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com