नवी मुंबई : राजकीय नेत्यांचे पाणी प्रश्नांकडे दुर्लक्ष; केवळ मिरवण्यासाठी नेते पद

water scarcity
water scarcitysakal media

खारघर : तळोजा वसाहतीत (Taloja society) गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा (water supply issue) होत आहे. विशेषतः सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीत (cidco housing society) अनियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे रहिवासी त्रस्‍त आहेत. एरवी छोट्या-मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणारे राजकीय पक्षांचे (political leader ignorance) पदाधिकारी पाणीप्रश्‍नावर काहीच बोलत नसल्‍याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. तळोजा फेज एकची लोकसंख्या पंचवीस हजारांहून अधिक आहे, तर फेज दोनमध्ये सिडको गृहनिर्माण व इतर खासगी विकसकांनी उभारलेल्या इमारतीत मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास येत असून लोकसंख्या पंधरा हजारांहून अधिक आहे.

water scarcity
कल्याण : लोक अदालतमध्ये वाहतूक पोलिस विभागाचे १० हजार ३२८ प्रकरणे निकाली

खारघरप्रमाणेच तळोज्‍यातही चाळीस सेक्टर असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी, परिसरात पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे, अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. मात्र कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी पाणीप्रश्नावर तोंड उघडत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी, तळोजा फेज दोनमध्ये रहिवाशांसोबत बैठक घेऊन पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र नंतर ते फिरकले नाहीत. तळोजा वसाहतीत शेकापमधून भाजपमध्ये दाखल झालेले हरीश केणी आणि शीतल केणी असे दोन नगरसेवक आहे. तसेच शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष तळोजा वसाहतीत वास्तव्य करतात.

जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची इच्छुकांना संधी

सहा महिन्यांत पनवेल महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे येथील विविध समस्या घेऊन जनतेपर्यंत पोहचण्याची इच्छुकांना संधी आहे. वसाहतीत रस्ते, पाणी, नालेसफाई आदी समस्‍या भेडसावत आहेत. तसेच येणाऱ्या पालिका निवडणुकीत तळोजा वसाहतीमधून दोन नगरसेवकांचे प्रभाग पडण्याची शक्यता असल्यामुळे जनतेपर्यंत पोहचण्याची नामी संधी कार्यकर्त्यांना आहे. मात्र त्याकडे सर्वच राजकीय पक्षांकडून दुर्लक्ष होत असल्‍यामुळे नागरिकांचा राजकीय कार्यकर्त्यांवरचा विश्वास कमी होताना दिसतो.

water scarcity
पालघर : पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आऊट'; १७१ गुन्हेगार घेतले ताब्यात

केवळ मिरवण्यासाठी नेते पद

काही राजकीय नेतेमंडळी वाहनावर पक्षाकडून मिळालेले पदाचे स्टिकर लावून तळोजा वसाहतीत मिरवताना दिसतात. काहींनी वीज बिल कमी करून देण्याचे आश्वासन देऊन नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार परिसरात घडल्याचे बोलले जाते; तर काही राजकीय कार्यकर्ते पदाचा गैरवापर करून फलक, होर्डिंग्ज लावून तळोजा वसाहत विद्रूप करीत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

तळोजा वसाहतीत पाणी समस्या गंभीर आहे. सिडको अधिकाऱ्यांना संपर्क केल्यास फोन उचलत नाही. सिडको दुर्लक्ष करीत असेल तर काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच आंदोलन केले जाईल.
-बबन केणी, रहिवासी व जिल्हा चिटणीस काँग्रेस

तळोजा वसाहतीत पाणी समस्या गंभीर असताना राजकीय पक्ष शांत आहेत. जनतेला सोबत घेऊन सिडकोच्या विरोधात आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारले पाहिजे.
- प्रमोद गायकर, रहिवासी, फेज दोन, तळोजा

सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीत घर लागले आहे. गृह प्रवेश करायच्या विचारात आहे. मात्र पाणी समस्या गंभीर असल्याचे समजले. त्‍यामुळे थोडे थांबलो आहोत.
- पूनम मोरे, लाभार्थी, सिडको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com