'तेलही गेले अन तूपही गेले, असंवेदनशीलतेचे धुपाटणे राहिले'; राठोडांच्या राजीनाम्यावर भाजपची टीका

'तेलही गेले अन तूपही गेले, असंवेदनशीलतेचे धुपाटणे राहिले'; राठोडांच्या राजीनाम्यावर भाजपची टीका

मुंबई - पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या राजिनाम्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा पिच्छा पुरवणाऱ्या भाजप नेत्यांनी राठोड यांच्या राजिनाम्यानंतरही सरकारवर, तेल गेले तूप गेले, अशा शब्दांत टीका केली आहे. 

राठोड यांच्या राजिनाम्याचे वृत्त आल्यावरही मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर टीका केली. आता राठोड यांचा राजीनामा म्हणजे सरकारचे तेल पण गेले आणि तुप पण गेले अशी अवस्था आहे. पंधरा दिवसांपूर्वीच राजीनामा घेतला असता तर उद्धव ठाकरे यांच्याबदद्ल ते संवेदनशील आहेत हे पटले असते. मात्र त्यांनी इतके दिवस लोकक्षोभ होईपर्यंत गप्प बसणे यातच त्यांची सत्ताअपरिहार्यता दिसून येते. म्हणूनच आता राजीनाम्याने राठोड गेले पण सरकारचा खरा चेहराही समोर आला. सरकारच्या हाती असंवेदनशीलतेचे धुपाटणे राहिले. पूजा चव्हाण ला न्याय मिळावा यासाठी भाजपाचा संघर्ष सुरूच राहिल, असेही उपाध्ये यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

त्यापूर्वी आज सकाळीही राजिनाम्यासाठी अतुल  भातखळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदींनी आजही राजधर्मावरून सरकारवर कोरडे ओढले. विशेष म्हणजे महाराष्ट्रधर्म म्हणजे काय हे सांगण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सिंहासनाधिष्ठित शिवरायांचा राजदंड दाखविलेल्या छायाचित्रावरूनच या दोघा भाजप नेत्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्याची संधी साधली. 

भातखळकर यांनी ट्वीटद्वारे सरकारवर हल्ला चढविला. सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असे दाखविणारे संजय राऊत यांच्या छायाचित्राचे ट्वीटदेखील त्यांनी सोबत जोडले आहे. महाराष्ट्रात जनाबसेनेने लाजधर्म सोडला, गब्रूंना पाठीशी घालण्याचा माजधर्म स्वीकारला, मग राजधर्म औषधाला तरी शिल्लक राहील काय ? असा प्रश्न भातखळकर यांनी त्यावर विचारला.

-------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

political marathi BJP criticizes sanjay Rathores resignation on pooja chavhan death issue politics news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com