चित्रा वाघ यांच्या पतीवरील गुन्हा! सूडाचे राजकारण होत असल्याचा भाजपचा आरोप

चित्रा वाघ यांच्या पतीवरील गुन्हा! सूडाचे राजकारण होत असल्याचा भाजपचा आरोप

मुंबई - भाजप उपाध्यक्ष श्रीमती चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात नोंदविलेल्या गुन्ह्याप्रकरणी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची पाठराखण केली असून राजकीय सूडभावनेतून हा गुन्हा नोंदविल्याची टीका त्यांनी केली आहे. 

2016 मधील एका लाचप्रकरणात बेहिशोबी मालमत्तेबाबत एसीबी कडून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याबाबत दरेकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर श्रीमती वाघ यांनीही हा आपल्याला गुंतविण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

चित्रा वाघ या लढवय्या नेत्या असून पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरण धसास लावण्यासाठी त्या एक महिला म्हणून धडपडत आहेत. याप्रकरणी त्यांनी पोलिसांच्या भेटी घेणे, पत्रकार परिषदा घेणे, निदर्शने करणे या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळेच आताच या गुन्ह्याची माहिती पुढे आणणे ही सरळसरळ सूडबुद्धीची कारवाई असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्या एकट्या नसून भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. 

सरकारने आपली यंत्रणा वापरून बेकायदेशीर प्रकारे असा कितीही आणण्याचा प्रयत्न केला तरी, जे चुकीचे आहे त्याविरोधा भाजप लढत राहिल व अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देईल. श्रीमती वाघ यांचा लढाही थांबणार नाही, आम्ही त्यांच्या मागे ताकदीने उभे राहू, असे सांगून दरेकर पुढे म्हणाले की, अनेक प्रकरणात कोणीही सरकारच्या विरोधात बोलले, सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, न्याय मागितला तर गळचेपी करायची असे सुडाचे राजकारण सुरू असून ते निषेधार्ह आहे.

---------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

political marathi Crimes against Chitra Waghs husband BJP leaders accuse Wagh of pursuing revenge politics pravin darekar politics live-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com