आरक्षणाचे राजकीय पडसाद - राणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

मुंबई - मराठा आरक्षणासोबत इतर मागण्यांवर लाखोंचे मोर्चे निघत असताना सरकार मात्र केवळ बैठका व चर्चा करण्याचे आश्‍वासन देत असल्याची नाराजी व्यक्‍त करत, सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा; अन्यथा मराठा समाजात पडसाद उमटले तर त्याला मुख्यमंत्रीच जबाबदार असतील, असा इशारा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिला. गांधी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्व अभ्यास झालेला आहे. सरकारकडे सर्व प्रकारची यंत्रणा आहे. तरीही आरक्षणाचा निर्णय घेतला जात नाही. अशी नाराजी राणे यांनी व्यक्‍त केली. दरम्यान, शिवसेनेवर टीका करत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या माफीनाम्याची खिल्ली उडवली. मराठा समाजामुळेच शिवसेना वाढली. मात्र, मराठा समाजाच्या पाठीशी शिवसेना कधीही राहिली नाही, असे राणे म्हणाले.

Web Title: political reaction on reservation