esakal | मराठा क्रांतीमोर्चा समन्वयकाचा भाजप सोडून शिवसंग्राममध्ये प्रवेश

बोलून बातमी शोधा

मराठा क्रांतीमोर्चा समन्वयकाचा भाजप सोडून शिवसंग्राममध्ये प्रवेश}

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम या मराठा संघटनेत नुकताच प्रवेश केला.  

मराठा क्रांतीमोर्चा समन्वयकाचा भाजप सोडून शिवसंग्राममध्ये प्रवेश
sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी समाजाचे कार्य प्रभावीपणे करता यावे यासाठी भारतीय जनता पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम या मराठा संघटनेत नुकताच प्रवेश केला.  

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

भारतीय जनता पक्षात जिल्हा पदाधिकारी असलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी नुकताच आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचा राजीनामा देऊन शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला. घाग यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठीची मोठी आंदोलने व प्रशासनासोबत चर्चा यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. मेटे हे मराठा समाजासाठी सतत कार्यरत असलेले व समाजासाठी सतत धावून येणारे कार्यकर्ते असल्याने आपण यापुढे समाजाच्या हितासाठी त्यांच्यासोबत वाटचाल करणार आहोत, असेही घाग यांनी यावेळी सांगितले. यापुढे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी व एकत्रीकरणासाठी काम करण्याचे घाग यांनी सांगितले. आज मराठा समाजासाठी आरक्षण अत्यंत जरुरीचे असताना सर्व राजकीय पक्ष राजकारण करत आहेत. अशावेळी सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन सर्व राजकीय पक्षांना मतपेटीतून धडा शिकवण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

politics marathi news updates Maratha Krantimorcha coordinator leaves BJP and enters Shiv Sangram political live latest