नवी मुंबईचा श्‍वास कोंडला 

नवी मुंबईचा श्‍वास कोंडला 

मुंबई : नवी मुंबईच्या हवेतील प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असून आज प्रदूषण अतिधोकादायक पातळीवर पोहचले होते. रविवारच्या सुटीमुळे मुंबईत वाहतूक कमी असल्याने आज शहरातील प्रदूषणाच्या पातळीत किंचित घट झाली होती; मात्र तरीही वांद्रे-कुर्ला संकुलाच्या परिसरात प्रदूषण धोकादायक पातळीवर होते. मुंबईच्या तापमानात उद्या घट होण्याची शक्‍यता असल्याने प्रदूषणाच्या पातळीतही वाढ होण्याचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्याभरापासून मुंबईची हवा खराब प्रदूषित होऊ लागल्याने श्‍वसनाच्या आजाराचे रुग्ण वाढल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला आहे. घसा खवखवणे, घशाला इन्फेक्‍शन होणे, दमा अशा आजारांच्या रुग्णांमध्ये २० ते ३० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. मुंबईत प्रामुख्याने वाहन, बांधकाम आणि काही प्रमाणात कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त असते. लोणावळा, खंडाळा या घाटमाथ्यावरील वाहनांतून निघणारे प्रदूषित वारे समुद्राच्या दिशेने येतात. त्यामुळे नवी मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नवी मुंबईतील हवा प्रदूषित होत आहे. आता थंडीची सुरुवात होत असल्याने प्रदूषणात अधिकच वाढत होत आहे.

तापमानात घट होणार
सोमवारी मुंबईतील तापमानात किंचित घट होण्याची शक्‍यता आहे. रविवारी सांताक्रूझ येथे कमाल ३४.५ अंश आणि किमान २४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे कमाल ३४.२ अंश सेल्सिअस आणि किमान २२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी मुंबईतील किमान तापमान २२ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

हवेतील प्रदूषणाची पातळी 
हवेतील पी.एम. २.५ चे प्रमाण (मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर) 
ठिकाण             शुक्रवार -रविवार -सोमवार (अंदाजित)

मुंबईची सरासरी :       १८७     १५८    १५८
वांद्रे-कुर्ला संकुल :     ३०३    २४०     २८०
कुलाबा :                २०६     १५०    १७०
नवी मुंबई :             २३९     ३०५    ३०७

सर्दी-खोकला, अस्थमा, सीओपीडी आदी आजारांच्या रुग्णांची संख्या ३० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. हवेतील बदलांमुळे गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी मास्क वापरण्यास हरकत नाही. 
- अव्या बन्सल, छातीविकारतज्ज्ञ, 
बॉम्बे हॉस्पिटल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com