अनलॉकनंतर तळोजा MIDC तून पुन्हा प्रदूषण सुरू; श्वसन रोग, दमा आदी आजार बळावण्याची शक्यता

गजानन चव्हाण
Tuesday, 6 October 2020

  • वायू प्रदूषणामुळे तळोजा वसाहती मधील नागरिक त्रस्त 
  • हवेत वायू प्रदूषण सोडणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी  गुरुवार पासून पथक तैनात करणार -प्रदूषण महामंडळ

खारघर : तळोजा औद्योगिक वसाहतीमधून पुन्हा रात्री पहाटेच्या वेळी हवेत सोडणाऱ्या वायू प्रदूषणामुळे तळोजा, कळंबोली आणि खारघरमधील राहिवाशी संताप व्यक्त करीत आहे. रात्रीच्या वेळी घराच्या दारा खिडक्या बंद करावे लागत आहेत. तर काहींनी मॉर्निंग वॉक बंद केले आहे. 

फौजदारी फिर्याद रद्द करण्यासाठी सुशांतच्या बहिणी मुंबई उच्च न्यायालयात

तळोजा औद्योगिक वसाहतीमधून पहाटेच्या वेळी हवेत सोडणाऱ्या वायू प्रदूषणामुळे तळोजा, रोडपाली, कळंबोली  खारघर आदी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर  दुष्परिणाम करणारा असून प्रदूषणामुळे श्वसन रोग, दमा आदी आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे वायू प्रदूषण बंद करण्यात यावे, यासाठी गत फेब्रुवारी महिन्यात खारघर तळोजा वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून  नागरिकांनी सीबीडी येथील प्रदूषण महामंडळच्या विरोधात धरणे, आंदोलन केले होते. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेले पाच महिने तळोजा परिसरातील कंपन्या बंद होत्या. या काळात परिसरात शुद्ध वातावरण होते.

मंदिरे उघडण्यासाठी विरारमधील पुजाऱ्याची 21 दिवस कठोर तपश्चर्या; सरकारचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शासनाने औद्योगिक वसाहतीत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर काही केमिकल कंपन्या सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून तळोजा परिसरातून रात्रीच्या वेळी  सोडण्यात येणारे वायू   प्रदूषणामुळे  अनेकांची झोप उडाली आहे. तर काहींना खिडक्या बंद करून झोपावे लागत आहे. तर अनेकांनी मॉर्निंग वॉकला जाणे बंद केले आहे. प्रदूषण महामंडळाने वायू प्रदूषण सोडणाऱ्या कारखाने बंद करावे अशी मागणी तळोजा मधील नागरिकांकडून केली जात आहे.

 

तळोजा  औद्योगिक वसाहती मधुन रोज रात्री सोडण्यात येणाऱ्या वायुप्रदुषणामुळे सकाळच्या वेळी   श्वास घेणे  मुश्किल झाले आहे. -
कैलास घरत
सामाजिक कार्यकर्ता 

 

सहा - दिवसापासून पहाटेच्या वेळी खिडकीद्वारे केमिकल युक्त   उग्रवास येत असल्यामुळे झोप नीट होत नाही.प्रदूषण महामंडळाने योग्य खबरदारी घ्यावी.- मनोज पांडा,
रहिवासी खारघर 

 

तळोजा एमआयडीसी मध्ये प्रदूषण करणाऱ्या दोन कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. तसेच येत्या गुरुवार पासून रात्रीच्या वेळी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर नजर ठेवण्यासाठी पथक कार्यरत करण्यात येणार आहे.-

किशोर केरळीकर,  
अधिकारी, प्रदूषण महामंडळ खारघर तळोजा.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution resumes from Taloja MIDC after unlock