उल्हासनदीला जलपर्णीने वेढले, संवर्धनाची गरज

संतोष पेरणे 
मंगळवार, 2 एप्रिल 2019

कर्जत - कर्जतच्या कातळदरा भागात उगम पावलेल्या उल्हासनदीचा सुरुवातीचा प्रवास हा पावसाळ्यापुरता पाणी वाहून नेणारा असतो. पुढे टाटा धरणाच्या पाण्याचा प्रवाह पेज नदीतून उल्हासनदीत सामील होतो. उल्हासनदी तेथून बारमाही वाहणारी होती आणि पुढे त्या उल्हास नदीचे पाणी कल्याण खाडीला जाऊन मिळेपर्यंत बदलापूर येथे ते सर्व पाणी अडवून शहरी भागाला पिण्यासाठी दिले जाते. अशा या महत्वाच्या नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. कारण कर्जत आणि नेरळ या शहरी भागाचे सांडपाणी या बारमाही वाहत्या नदीत वाहून येत असते.

कर्जत - कर्जतच्या कातळदरा भागात उगम पावलेल्या उल्हासनदीचा सुरुवातीचा प्रवास हा पावसाळ्यापुरता पाणी वाहून नेणारा असतो. पुढे टाटा धरणाच्या पाण्याचा प्रवाह पेज नदीतून उल्हासनदीत सामील होतो. उल्हासनदी तेथून बारमाही वाहणारी होती आणि पुढे त्या उल्हास नदीचे पाणी कल्याण खाडीला जाऊन मिळेपर्यंत बदलापूर येथे ते सर्व पाणी अडवून शहरी भागाला पिण्यासाठी दिले जाते. अशा या महत्वाच्या नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. कारण कर्जत आणि नेरळ या शहरी भागाचे सांडपाणी या बारमाही वाहत्या नदीत वाहून येत असते. त्या सांडपाण्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यात प्रदूषण झाले असून, त्या प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णी यांची वाढ झाली आहे. बारमाही वाहत्या असलेल्या उल्हासनदीसाठी पाणी प्रदूषित करणाऱ्या जलपर्णीने व्यापले आहे.

कर्जत येथून खऱ्या अर्थाने उल्हासनदीला सध्या जलपर्णीचा विळखा बसला आहे. नेकदा या जलपर्णी काढण्याचे काम कर्जत परिसरात हाती घेण्यात आले. परंतु, काढलेली जलपर्णी ही नदी पात्रातून काढून बाहेर न टाकता नदीपात्रातच टाकली जात असल्याने ही जलपर्णी नेरळ, शेलू, वांगणी परिसरात पाण्याच्या प्रवाहात वाहून नदी पत्रातील पाणी दूषित झाले आहे. कर्जत शहरात नागरी वस्तीतली सांडपाणी वाहून नेणारी गटारे ही उल्हासनदीमध्ये सोडली आहेत. यावर उपाययोजना आवश्यक आहे. 

नदीचे पाणी केवळ गढूळ बनले नाही तर त्या पाण्याला चिकटपणा देखील आला आहे. दुसरीकडे वाहत्या नदीमध्ये पोहण्याची मजा घेणारे यांच्या शरीरावर खाज सुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नदीमध्ये पोहायला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र ही समस्या केवळ कर्जत शहारत सांडपाणी उल्हासनदीमध्ये सोडल्यामुळे निर्माण झालेली नाही. तर गेल्या काही वर्षात सातत्याने नागरीकरण झालेल्या नेरळ शहर वजा गावातून असलेल्या रहिवाशी भागातील सांडपाणी देखील माथेरानच्या डोंगरातून पावसाळ्यात पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात सोडले आहे.तो नाला नंतर नेरळ येथे उल्हासनदीला जाऊन मिळतो. त्यामुळे कर्जत नंतर उल्हासनदी मध्ये नदीचे पाणी प्रदूषित करणारे जलपर्णी यांचे उगम हे नेरळ गावातून देखील झाले आहे. ते सांडपाणी येथे उल्हासनदीमध्ये गेल्यानंतर जलपर्णी यांच्या संख्येने वाढ होते. ही समस्या केवळ सांडपाण्यामुळे निर्माण झाली असल्याचे सगुणाबाग या कृषी पर्यटन केंद्राचे नदीचे पाणी मुंबई येथे परीक्षणासाठी पाठविल्यानंतर आलेल्या अहवालातून स्पष्ट दिसून येत आहे. 

कृषिरत्न शेतकरी असलेले शेखर भडसावळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव, कर्जत पंच्यात समितीचे माजी सभापती एकनाथ धुळे यांनी उल्हासनदीचे पाणी प्रदूषित होण्यास काय कारणीभूत आहे. याचा अभ्यास केला आहे. पण त्यातून सांडपाणी यावर जलपर्णी तयार होतात या निष्कर्षाप्रत सर्व आले आहेत. पण आता ते सांड्पाणी उल्हासनदीमध्ये सोडले जाणार नाही याची काळजी कोणी घेणार की नाही? हा प्रश्न सतत भेडसावत आहेत. कारण सांडपाणी निर्माण करीत असलेल्या जलपर्णी यांना रोखण्यासाठी प्रथम नदीमध्ये सोडले जणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचवेळी सांडपाणी उल्हासनदीच्या पाण्यात सोडले गेले तरी ते प्रक्रिया करून सोडले जावे याचे काटेकोर पालन केले जावे. त्याचवेळी उल्हासनदीच्या वाहत्या पाण्यात जलपर्णी वाहून जाणार नाही त्यांना रोखण्याचे काम देखील करावे लागेल. त्यासाठी उल्हासनदी ज्याठिकाणी बारमाही पाण्याला जाऊन मिळते, त्या ठिकणी लोखंडी जाळी लावून पाणी अडवावे लागेल. या गोष्टी नेरळ येथे देखील आहेत. आणि तसे केले तर मग कदाचित उल्हासनदीचे पिण्याचे पाणी जे डोंबिवली जाते ते प्रदूषित होण्यावर काही प्रमाणात बंधने येतील. 

Web Title: polution in ulhas river need to conservation