पुनम महाजन यांना नवी संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

खासदार प्रिया दत्त यांच्याविरोधात त्यांना शेवटच्या क्षणाला तिकिट देण्यात आले होते. मतदारसंघाची पूर्वपिठिका माहिती नसतानाही मोदी लाटेमुळे एक लाखाहून अधिक मताधिक्‍क्‍याने त्या निवडून आल्या. भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटविणाऱ्या प्रमोद महाजन यांच्यामुळे पूनम राव महाजन यांना आजही सहानुभूती मिळते.

मुंबई - उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या तरुण खासदार पुनम महाजन यांची भाजपाच्या राष्ट्रीय युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा वारस म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. 

'बीसीसीआय'चे अध्यक्ष असलेले खासदार अनुराग ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अडचणीत आलेले आहेत. लोढा समितीच्या शिफारसींच्या अंमलबजाणीबाबत केलेल्या दिरंगाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकूर यांच्याविरोधात ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होउ नये याची खबरदारी भाजपचे नेते घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरुनही ठाकूर यांची उचलबांगडी करुन पुनम महाजन यांच्याकडे सूत्रे देण्यात आली आहेत. पुनम महाजन यांच्यावर पक्षाने मोठा विश्‍वास दाखवला असला तरी, ज्या मतदारसंघातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत, तेथील नागरी समस्याकडेही त्यांनी निवडून आल्यानंतर म्हणावेसे लक्ष दिले नसल्याचे बोलले जाते. 

खासदार प्रिया दत्त यांच्याविरोधात त्यांना शेवटच्या क्षणाला तिकिट देण्यात आले होते. मतदारसंघाची पूर्वपिठिका माहिती नसतानाही मोदी लाटेमुळे एक लाखाहून अधिक मताधिक्‍क्‍याने त्या निवडून आल्या. भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटविणाऱ्या प्रमोद महाजन यांच्यामुळे पूनम राव महाजन यांना आजही सहानुभूती मिळते. परंतु, राजकारणात मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही तर पुन्हा विजनवास येवू शकतो, याचे भान वारसा परंपरेने राजकारणात आलेल्या व्यक्‍तिंना ठेवावे लागते. ते भान पूनम महाजन यांनाही ठेवावे लागेल.

प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पुनम महाजन यांनी 2006 मध्ये भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारुन काम सुरु केले. गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्षांमध्ये सक्रीय होताना 2010 साली भाजपा राष्ट्रीय युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. अनुराग ठाकूर यांच्या जागी पूनम महाजन यांची वर्णी लावून पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी प्रमोद महाजन यांना मानणाऱ्या पक्षांतील सहकाऱ्यांना चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या पदावर काम करताना पूनम महाजन यांच्याकडून महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यातील तरुण भाजप कार्यकर्त्यांची पक्ष बांधणी केल्यास त्यांना पक्षाकडून यापुढेही आणखी मोठी जबाबदारी दिली जाउ शकते, असे भाजपातील एका ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Poonam Mahajan new innings started in BJPखासदार प्रिया दत्त यांच्याविरोधात त्यांना शेवटच्या क्षणाला तिकिट देण्यात आले होते. मतदारसंघाची पूर्वपिठिका माहिती नसतानाही मोदी लाटेमुळे एक लाखाहून अधिक मताधिक्‍क्‍याने त्या निवडून आल्या. भाजपाच्या राष्ट्रीय राजकार