दीनानाथ नाट्यगृहातील प्रसाधनगृहाची दुरवस्था, कलाकारांकडून नाराजी व्यक्त

दीनानाथ नाट्यगृहातील प्रसाधनगृहाची दुरवस्था, कलाकारांकडून नाराजी व्यक्त

मुंबई: सरकारने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहातील प्रसाधनगृहाची दुरवस्था झालेली आहे. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या नाट्यगृहात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. महापालिकेने पाच वर्षांपूर्वी सोळा कोटी रुपये खर्च करून या नाट्यगृहाची डागडुजी केली असली तरी आता येथील प्रसाधनगृहांची दुरवस्था पाहिल्यानंतर प्रेक्षक नाटक पाहायला येतील का असा प्रश्न रंगकर्मी विचारत आहेत.

याबाबत जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, की नाट्यगृहे सरकारने सुरू केली त्याबद्दल सरकारचे आभार मानतो. परंतु आमचे काही पदाधिकारी दीनानाथ नाट्यगृहात गेले असता तेथील प्रसाधनगृहाची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. सोळा कोटी रुपये या नाट्यगृहावर महापालिकेने खर्च केले आणि त्याची ही अवस्था. 

सोळा कोटी रुपयांमध्ये एखादे नवीन नाट्यगृह बांधून झाले असते. डागडुजीसाठी सोळा कोटी रुपये खर्च केले आणि तकलादू काम केलं, असल्याचंही अमेय खोपकर म्हणालेत. 

अभिनेते प्रशांत दामले म्हणाले, की मी आणि निर्माते दिलीप जाधव आम्ही स्वतः या नाट्यगृहात गेलो असता येथील प्रसाधनगृहाची अवस्था पाहून आम्ही थक्क झालो. २०१५ मध्ये सोळा कोटी रुपये खर्च केले. तरीही खूप बिकट अवस्था आहे. खूपच अस्वच्छता आहे. आता नाट्यगृहे सुरू करण्याची वेळ आली आहे आणि प्रसाधनगृहाची ही अवस्था, प्रेक्षकांनी नाटक पाहायला कसे यायचे? शिवाय सेटचे सामान नेणारी लिफ्टही बंद आहे. 

दीनानाथ नाट्यगृहाच्या व्यवस्थापिका ऋतुजा फातर्पेकर म्हणाल्या, की याबाबतीत आमचे संबंधित विभागाशी बोलणे झालेले आहे. गुरुवारपासून थोडे थोडे काम सुरू झाले आहे आणि सोमवारपासून या कामाला अधिक गती येईल.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Poor condition toilet Master Deenanath Mangeshkar Natyagriha expressed displeasure from actors

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com