लोकल सुरु होण्याची पॉझिटिव्ह चिन्ह, सरकारच्या प्रस्तावावर मध्य रेल्वेकडून आलं उत्तर

सुमित बागुल आणि प्रशांत कांबळे
Wednesday, 28 October 2020

"सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत रेल्वे कायमच उपनगरीय लोकल सेवा अधिकाधिक उत्तमरीत्या देण्यास तयार असते."

मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी मुंबईकरांच्या सेवेत रुजू करा अशी विनंती महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंडळाला केली आहे. कोविड विषयक नियम आणि अटींनूसार प्रवासी आणि अत्यावश्‍यक सेवांसाठी वेगवेगळी वेळापत्रके निश्‍चित करून सामान्यांना लोकल प्रवास खुला करावा, असे पत्र आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत आणि पुनर्वसनमंत्री विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी आज पाठवले आहे.

या पत्राला रेल्वेकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण मध्य रेल्वेने तसं महत्त्वाचं ट्विट केलं आहे. 

महत्त्वाची बातमी : दिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज एक हजार जादा फेऱ्या; परिवहन मंत्र्यांची माहिती

मध्य रेल्वेने केलेल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय :  

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत रेल्वे कायमच उपनगरीय लोकल सेवा अधिकाधिक उत्तमरीत्या देण्यास तयार असते. महाराष्ट्र राज्य सरकारसोबत  सल्लामसलत केल्यानंतर अतिरिक्त सेवा पुरवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. 

सरकारचा प्रस्ताव काय आहे :  

कोरोना प्रसाराचा मोठा धोका लक्षात घेता सरकारने रेल्वेला पाठवलेल्या प्रस्तावामध्ये प्रवाशांच्या वर्गवारीनूसार वेळा सुचवल्या आहेत. 

  • सर्वसाधारण तिकीट, पासधारक प्रवासी -  पहिल्या लोकलपासून सकाळी 7.30 पर्यंत, त्यानंतर दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत आणि रात्री 8 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत 
  • अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी - सकाळी 8 ते 10.30 आणि संध्याकाळी 5 ते 7.30 
  • महिलांसाठी दर तासाने विशेष गाडी

positive response by central railways to letter sent by government to start locals for everyone


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive response by central railways to letter sent by government to start locals for everyone