तेलमाफियांची टोळी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मुंबई : परदेशी जहाजातून डिझेल चोरी करणाऱ्या ३९ जणांच्या टोळीला रायगड जिल्हा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात कोटी ८१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात १४ लाख ३१ हजार रुपयांचे २१ हजार लिटर डिझेल, आठ बोटी, तीन बार्जचा समावेश आहे. रायगड पोलिसांची आतापर्यंतची डिझेलचोरी प्रकरणातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील निम्म्याहून अलिबाग आणि पेण तालुक्‍यातील जेएसडब्ल्यू, पीएनपी जेट्टी येथे येणारे मालवाहू बार्ज आणि इतर मालवाहू जहाजांवरील कप्तान आणि खलाशांबरोबर संपर्क साधून त्यांच्याकडून स्वस्त दरात डिझेल घेणाऱ्या अनेक टोळ्या आहेत.  त्या मच्छीमारी बोटींना डिझेल विक्री करतात.

मांडवा, रेवस आणि मुरूड येथे सागरी मार्गात असा प्रकार घडतो. रात्रीच्या वेळी सागरी सुरक्षा यंत्रणेला चकवा देत या टोळ्या चोरी करतात. या चोरीच्या डिझेलला भाऊचा धक्का, ससून डॉक, रेवस, करंजा, मांडवा येथील धक्‍क्‍यावर ग्राहक मिळतात. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला या चोरीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर ही धडक कारवाई केली. यामध्ये सुमारे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशी होते चोरी 
परदेशातून आलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांकडून चोरट्यांची टोळी कमी किमतीत डिझेल घेते. ते डिझेल अधिक किमतीत मच्छीमारांना विकण्यात येते. रात्रीच्या वेळी अरबी समुद्रात गस्त घालणाऱ्या नौदल, सीमा शुल्क विभाग, तटरक्षक दल आणि पोलिस यांना चकवा देऊन ही चोरी होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In possession of a gang of oil mafias