पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये बदलाचे वारे

congress
congress

विरार : पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले असून जिल्हाध्यक्ष केदार काळे यांची उचलबांगडी होणार असून त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या दृष्टीने काही दिवसापूर्वी नव्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. 

पालघर पालिका निवडणुकी वेळी पक्षाला विश्वासात न घेता परस्परपणे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आपल्या पत्नीला उभे केल्याचा ठपका केदार काळे यांच्यावर ठेवण्यात आला असून या प्रकरणाची गंभीर दखल प्रदेशने घेतली असून काळे यांच्या जागेवर नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी काही दिवसापूर्वी पालघरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती माजी मंत्री मधु चव्हाण, संतोष केणे आणि निलेश पेंढारी यांनी घेतल्या आहेत. यामध्ये मधुकर चौधरी, दिवाकर पाटील, संगीता धोंडे, चंद्रकांत दुबे आणि रुसी भुरे यांचा समावेश आहे.

यावेळी जिल्ह्याला तीन ते चार कार्याध्यक्ष देण्यात येणार आहेत दोन तालुके मिळून एक कार्याध्यक्ष असणार आहे हे बदल विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्यात येणार असून नवीन अध्यक्षाला विधानसभेची रणनीती त्यामुळे आखता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com