#MarathaKrantiMorcha वृद्धाला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पनवेल : कळंबोलीतील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या धावपळीत पाय घसरून पडलेल्या उस्मानाबाद येथील 75 वर्षीय शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्‍यता आहे. दत्तू टिकुरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

उस्मानाबादच्या धोत्री (ता. परांडा) येथील दत्तू टिकुरे कळंबोलीतील मुलाकडे राहायला आले होते. 25 जुलैला मराठा समाजाच्या वतीने शीव-पनवेल महामार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ते आपल्या घरी निघाले होते. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केल्यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. त्या धावपळीत टिकुरे यांना एका आंदोलकाचा धक्का लागल्याने ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडाला फटका लागला. यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया न झाल्यास कायमचे अपंगत्व येण्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तवली आहे. 

गोळीबाराच्या चौकशीची मागणी 

आंदोलनादरम्यान गोळी लागून जबर जखमी झालेले दत्तू वाघमारे हेदेखील उस्मानाबाद जिल्ह्यातील असून, त्यांच्यावरही एमजीएम रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. चालक असलेले वाघमारे तळेगावहून मुंबईला कंटेनर घेऊन निघाले होते. रास्ता रोकोदरम्यान आंदोलकांनी वाघमारेंची गाडी अडवली. याचदरम्यान त्यांना गोळी लागली होती. दरम्यान, कळंबोलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी वाघमारेंच्या कुटुंबीयांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. 

Web Title: Possibility of getting old age permanent disability