लाथो के भूत बातों से नही मानते, वीज बिलासाठी मनसेकडून आंदोलनाचा इशारा

पूजा विचारे
Thursday, 19 November 2020

लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना आलेल्या भरमसाठी वीज बिलात सवलत देण्यास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नकार दिला. मनसे देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. मनसेचे सरचिटणीस यांनी ट्विट करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. लाथो के भूत बातों से नही मानते, असं सूचक ट्विट त्यांनी केले आहे.

मुंबईः  लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना आलेल्या भरमसाठी वीज बिलात सवलत देण्यास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नकार दिला. त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. मनसेचे सरचिटणीस यांनी ट्विट करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. लाथो के भूत बातों से नही मानते, असं सूचक ट्विट त्यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यात आता वीज बिलाच्या मुद्द्यावरुन देशपांडे यांनी ट्विट केले असून या ट्विटमध्ये ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे.

अधिक वाचा भाजपमुळेच महावितरण आर्थिक संकटात, नितीन राऊतांचा भाजपवर निशाणा

वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण "लाथो के भूत बातों से नही मानते, असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. 

आज वाढीव वीज बिलासंदर्भात मनसेनं आज बैठक होणार आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत वीज बिलासंदर्भात आंदोलनाची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.  तर दुसरीकडे आजच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यावेळी वीज बिलांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुंबई विभागातल्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 Possibility of MNS agitation for electricity bill Tweet by Sandeep Deshpande


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of MNS agitation for electricity bill Tweet by Sandeep Deshpande