प्रवासापूर्वी सामान पाठवणे शक्य

प्रवासापूर्वी सामान पाठवणे शक्य
प्रवासापूर्वी सामान पाठवणे शक्य

मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टूरिझम कॉपोर्रेशन लिमिटेडतर्फे (आयआरसीटीसी) मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्‍स्प्रेसचे प्रवासी एक दिवस आधी सामान पाठवू शकणार आहेत. आयआरसीटीसीतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी स्टार्ट अप कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. 

लांब पल्ल्यांचा प्रवास करताना प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात सामान असते. त्यामुळे प्रवाशांना खासगी चारचाकी किंवा टॅक्‍सीने रेल्वेस्थानक ते घर किंवा घर ते रेल्वेस्थानक असा प्रवास करावा लागतो. अनेकदा प्रवासादरम्यान प्रवाशांचे चालकांशी वाद होतात, कधीकधी सामान चोरीला जाते किंवा सामान चुकून, घाई गडबडीमध्ये वाहनातच राहते. या अडचणींमधून प्रवाशांची सुटका होण्यासाठी आयआरसीटीसीने योजना आखली आहे. मुंबई-अहमदाबाद तेजस एक्‍स्प्रेसच्या प्रवाशांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवासी प्रवासाआधी एक दिवस आपले सामान आयआरसीटीसीकडे सुपूर्द करू शकतात. प्रवासी ज्या ठिकाणी जाणार आहेत किंवा ज्या हॉटेलमध्ये उतरणार आहेत, तेथे त्यांचे सामान पोहोचविण्याचे काम आयआरसीटीसी करणार आहे.

नवउद्योजकांसोबत चर्चा
योजनेबाबत आयआरसीटीसीची स्टार्ट अप कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. या कंपन्यांमार्फत आयआरसीटीसी प्रवाशांचे सामान ताब्यात घेणार आहे. सामानातील एका किलो वजनासाठी प्रवाशाला १०० रुपये दर आकारण्यात येणार आहे. रस्ते किंवा हवाई मार्गे एक दिवस आधीच प्रवाशांचे सामान इच्छितस्थळी पोहोचविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com