माझा आमदार, माझा मुख्यमंत्री; शिवसेनेची पोस्टरबाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत. यावर आदित्य ठाकरे यांच्या छायाचित्राच्या बाजूला साहेब आपण करुन दाखवल असे लिहिण्यात आले आहे.

मुंबई : मुख्यमंत्रीपदावर ठाम असलेल्या शिवसेनेने आता मुंबईत पोस्टरबाजी करत माझा आमदार, माझा मुख्यमंत्री असे लिहिलेले पोस्टर्स लावले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचा फोटो प्रामुख्याने दाखवत विधानभवनावर भगवा फडकत असल्याचेही चित्र प्रसिद्ध केले आहे.

शिवसेनेचे संख्याबळ 56 वरून 64 वर; 'या' आमदाराचाही पाठिंबा

राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आज (मंगळवार) 13 दिवस झाले असून, अद्याप सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच बहुमताचा आकडा आमच्याकडे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. 

होय, मी शरद पवारांच्या संपर्कात, त्यांच्याशी बोलण्यात गैर काय : राऊत

मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत. यावर आदित्य ठाकरे यांच्या छायाचित्राच्या बाजूला साहेब आपण करुन दाखवल असे लिहिण्यात आले आहे. माझा आमदार माझा मुख्यमंत्री असेही म्हटले आहे. शिवसेनेचे नगरसेवक हाजी हलीम खान यांच्याकडून हे पोस्टर लावण्यात आले आहेत. 

शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a poster with a picture of Shiv Sena leader Aditya Thackeray in Mumbai