कळव्यात पोस्टर वॉर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कळवा - पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीने प्रचारासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवायला सुरुवात केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये सध्या ‘पोस्टर वॉर’ रंगल्याचे दिसून येत आहे.

कळवा - पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीने प्रचारासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवायला सुरुवात केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये सध्या ‘पोस्टर वॉर’ रंगल्याचे दिसून येत आहे.

कळवा नाका येथे शिवसेनेच्या वतीने लावलेल्या जाहिरातीतून शिवाजी रुग्णालयाचा कायापालट दाखवण्यात आला आहे. सुसज्ज आयसीयू वॉर्ड, आधुनिक शास्रक्रिया विभाग जाहिरातीत दाखवून ‘स्वछ ठाणे, स्मार्ट ठाणे’, ‘निरोगी ठाणे, तंदुरुस्त ठाणे’ असे सांगत मतदारांना आकर्षित केले जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने त्याच्याशेजारी लावलेल्या जाहिरातीतून ‘स्मार्ट ठाणे, झुरळांचे ठाणे’, ‘शिवाजी रुग्णालयात झुरळे जास्त, डॉक्‍टर कमी’ असे सांगत डॉक्‍टरांच्या जेवणात सापडलेली झुरळे दाखवणारी पोस्टर्स लावली आहेत. २५ वर्षे शिवेसना सत्तेत असून पालिकेचे स्वतःचे धरण नसल्याने पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मोर्चे काढावे लागतात, असे एका जाहिरातीत म्हटले आहे.  दोन्ही पोस्टर्सवर नेत्यांची नावे नाहीत. मतदारांच्या कामांसाठी फारसा खर्च न करणारे पक्ष जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करत आहेत. या पोस्टर्सना पाहून मतदार भुलून मतदान करणार का, याचे उत्तर २१ फेब्रुवारीला मिळणार आहे.

Web Title: poster war in kalwa

टॅग्स