खड्ड्यांची स्थिती जाहीर करा - न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्‍वर ते अरवलीदरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत राज्य सरकार करत असलेला दावा चुकीचा आहे, असा आरोप गुरुवारी याचिकाकर्त्यांनी केला. त्यामुळे या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याने न्यायालयात उपस्थित राहावे; तसेच खड्ड्यांच्या स्थितीबाबत सरकारी संकेतस्थळावर स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश खंडपीठाने सरकारला दिले. मुंबई-गोवा महामार्ग (एनएच-10) खड्डेमुक्त असावा, या मागणीसाठी वकील ओवेस पेचकर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांच्यासमोर सुनावणी झाली.
Web Title: Pot Hole Condition Declare Court