मुंबईतील खट्यांवरून महापालिकेत रणकंदन

pothole in Mumbai Municipal Corporation
pothole in Mumbai Municipal Corporation

मुंबई : खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यावरून आज पालिकेच्या सभागृहात रणकंदन झाले. दोषी कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळेच रस्ते उखडले या आरोपांची गंभीर दखल घेत मुंबईतील रस्त्यावरील खड्डे येत्या 48 तासांत बुजवले जातील, खड्डे चुकीच्या पद्धतीने बुजवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल केले जातील, अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल आज पालिकेच्या सभागृहात दिली. 

मुंबईला सल चार दिवस पावसाने झोडपले. मुंबई जलमय झाली. वाहतूक कोंडीने रस्ते ब्लॉक झाले. रस्त्यांची दैना झाली. रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. आज पालिकेच्या सभागृहात या प्रकरणी कॉंग्रेसचे नेते रवी राजा यांनी निवेदन केले. खड्ड्यांप्रकरणी दोषी कंत्राटदारांविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. दोषी कंत्राटदार आणि भ्रष्ट पालिका अधिकारी हेच खड्ड्यांना जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डे का पडतात असा संतप्त सवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रशासनाला केला. सर्वच प्रभागातील रस्ते खड्डयांनी व्यापले असल्याबद्दल प्रशासनाच्या निष्क्रीय कारभाराचे नगरसेवकांनी वाभाडे काढले. हे अजून किती दिवस मुंबईकर सहन करणार आहे, असा सवाल विचारत कंत्राटदार आणि प्रशासन यांच्यावर हल्लाबोल केला. पालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी रस्त्यांतील खड्ड्यांबाबत आज पालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तातडीने उपायोजना करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोणत्याही अधिकारी किंवा कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. येत्या 48 तासांत खड्डे बुजवले जातील. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. चुकीच्या पध्दतीने खड्डे बुजविण्याची कामे केल्यास गुन्हे दाखल केले जातील. 

-विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगर पालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com