बोर्डीत रस्त्यांची दुरावस्था

अच्युत पाटील
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

बोर्डी : सार्वजनीक बांधकाम खात्याने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने बोर्डी परिसरातील रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने वहानं कशी चालवायची असा प्रश्ण चालकांना सतावत आहे. अखेर आज बुधवारी (ता.22) सकाळी परिसरातील रिक्षाचालकांनी आपला व्यवसाय बाजूला ठेवून घोलवड चावडीनाका येथून पुढील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.
    
सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही सार्वजनीक बांधकाम खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे बोर्डी ते डहाणु (पारनाका)पर्यंतच्या पंधरा किलोमिटर   मार्गाचे नुतनीकरण पावसाळ्यापुर्वी न केल्याने रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे.

Web Title: pothole road issue in boardi