पवई तलावात सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई  - पवई तलावात आजूबाजूच्या निवासी वसाहती आणि लगतच्या कारखान्यांचे रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे तलावातील जीवसृष्टी नष्ट होत आहे. तलावाला या पाण्याचा धोका निर्माण झाला असून सांडपाणी सोडणाऱ्यांविरुद्ध; तसेच त्यांना मदत करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षांच्या सदस्यांनी केली. त्यानंतर कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला. 

शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी पवई तलावाला धोका निर्माण झाल्याबद्दलचा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला स्थायी समितीतील सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. हिरानंदानी वसाहतीतील इमारतींचे सांडपाणी तलावात सोडले जात असून, त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही, असे कोरगावकर यांनी विचारले. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळानेही तलावातील प्रदूषणाची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी कारवाई करण्याची सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला केली. पवई तलावात हाऊस बोट उलटून तीन जणांचा मृत्यू झाला. स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी निवासी बोटी बंद करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली. बोटींच्या मालकांना "कारणे दाखवा' नोटीस पालिकेने पाठवली असून, या बोटी बंद करण्यात येतील, असा निर्णय प्रशासनाने लगेच घेतला.

Web Title: Powai lake action on sewage release water