रोकठोक संजय राऊतांची 'ही' आहेत रोकठोक वक्तव्य..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार असं ठाम मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलंय. आमदार बैठकीत 'उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सर्व आमदारांचा पाठिंबा' दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. भाजपच्या भूमिकेमुळं अद्याप सत्ता स्थापन होऊ शकली नाही असंही राऊत यांनी म्हटलंय.

राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार असं ठाम मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलंय. आमदार बैठकीत 'उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सर्व आमदारांचा पाठिंबा' दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. भाजपच्या भूमिकेमुळं अद्याप सत्ता स्थापन होऊ शकली नाही असंही राऊत यांनी म्हटलंय.

संजय  राऊत आज काय काय बोलले :  

 

 • उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल 
 • जनेतेला वेठीस धरण्याचं काम भाजपनं करू नये 
 • भाजप महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करत आहे
 • भाजपकडे बहुमत नसेल तर, त्यांनी महाराष्ट्राला स्पष्ट सांगाव

 

 

 • आमच्याकडे पर्याय आहे, त्याशिवाय आम्ही बोलत नाही
 • सत्तेचा माज असणारेच साम, दाम, दंड भेदची भाषा वापरतात  
 • भाजपकडून घटनात्मक पेच निर्माण करण्याचा प्रयत्न 
 • संविधान ही भाजपची जहाँगिरी नाही
 • हा खेळ आता फार काळ चालणार नाही 
 • शिवसेना पहिल्या दिवसापासून भूमिकेवर ठाम 
 • भाजप सध्या वेळ काढण्याचा प्रयत्न करत आहे
 • आता धमक्या, ब्लॅकमेलिंग चालणार नाही 

 

 • गोड बातमी सांगणारे मुनगंटीवार, लाडवाची किती जेवणं घालतात हे माहिती नाही 
 • महाराष्ट्राचा जनादेश अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपद 
 • राज्याचं नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल 

 

 • उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला आमदारांचा पाठिंबा
 • युती तोडण्याचं काम उद्धव ठाकरे करणार नाहीत 
 • शिवसेनेनं कोणत्याही आमदाराला सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं नाही 
 • फडणवीस जर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, तर त्यांनी 145
 • आमदारांचं बहुमत सिद्ध करावं

 

आज शिवसेना आमदारांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर बैठक पार पडली. आता अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदावरच चर्चा होणार, अट मान्य असेल तरच मातोश्रीवर फोन करावा अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. 

WebTitle : powerful statements of shivsena leader sanjay raut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: powerful statements of shivsena leader sanjay raut