'रेजिंग डे'निमित्त डोंगरी पोलिसांची विद्यार्थ्यांसह प्रभात फेरी

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

मुंबई - पोलिसांनी शिस्तबध्द संचलन करीत विद्यार्थ्यांसह मुख्य मार्गावरुन प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीचे मुख्य वैशिष्ठये म्हणजे स्वच्छता अभियान राबवा आणि अंमली पदार्थांना विरोध करा, बेटी वाचवा, बेटी शिकवा, प्लास्टिकमुक्त जीवनजगा, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण, वाघ वाचवा, वन्यजीव वाचवा असे विविध नारे देत प्रभात काढण्यात आली. 

डोंगरी पोलिस ठाणे हद्दीतील विविध शाळेचे विध्यार्थी व शिक्षक, मोहला कमिटीचे सदस्य व विभागातील मान्यवर यांचे सोबत स्वच्छता अभियान, अंमली पदार्थ सेवन विरोधात प्रभात फेरी काढण्यात आली. दाऊद फजल हाईस्कूल (37) विद्यार्थी,ऑर्चिड स्कूल(53), मांडवी मनपा स्कूल(50) हबीब टेक्नीकल (30,) असे मिळून जवळपास 175 विद्यार्थी प्रभात फेरीत उपस्थित होते. 

डोंगरी पोलिस ठाणे वपोनि संदीप भागडीकर, मोहन येडूरकर, स.पो.नि.निकम, पो.उप.नि.माळी, पो.उप.नि.राणे, MS महेश घाडगे, MS गणेश शिंत्रे यांनी विद्यार्थी मित्रांसोबत फेरीत सहभाग घेतला.

विद्यार्थी दशेतच मुलांमध्ये देशप्रेम निर्माण करणे गरजेचे असते. पोलिस हा जनतेचा रक्षक आहे हिच भावना मुलांमध्ये रुजविने गरजेचे आहे. अंमली पदार्था विरुद्ध एका नव्या लढाईचा आरंभ पोलिस जनतेला आणि विद्यार्थ्यांना सोबत घेत करीत आहेत. मुबई नशामुक्त होने फारच गरजेचे आहे.
- संदीप भागड़ीकर (व.पो.नि.डोंगरी पोलिस)

Web Title: Prabhat feri with the students of hill police in 'Raging Day'