छत्र्यांमधून दिसताहेत इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा

विजय गायकवाड
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

1990 च्या दशकापासून वसई, विरार नालासोपाऱ्यावर हितेंद्र ठाकुरांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी मागच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीपासून शिवसेना, भाजपने याठिकाणी ताकद पणाला लावली आहे.

नालासोपारा : 1990 च्या दशकापासून वसई, विरार नालासोपाऱ्यावर हितेंद्र ठाकुरांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी मागच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीपासून शिवसेना, भाजपने याठिकाणी ताकद पणाला लावली आहे. तसेच आता छत्रीच्या माध्यमातून इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा सगळीकडे दिसत आहे.

साम, दाम, दंड, भेद वापरुन कोणत्याही परिस्थिती हा गड जिंकायचा असा कयास बांधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रदीप शर्मा यांना नालासोपारा विधानसभेत शिवसेनेकडून उतरविण्यासाठी यंत्रणाही सक्रिय केली आहे. प्रदिप शर्मा यांनी पोलिस खात्यातून निवृत्ती घेण्यापूर्वीच पावसाळी छत्र्यांच्या माध्यमातून नालासोपारा विधानसभेत त्यांची इंन्ट्री झाली आहे. 

असे असले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मागच्या तीस वर्षांपासून येथील जनतेशी हितेंद्र ठाकुरांची जुळलेली नाळ तोडण्यात खरच प्रदिप शर्मा यशस्वी होतील का? हे मात्र येणाऱ्या काळात पहावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradeep Sharmas Images showing on Umbrella