विरार : प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ ?

sharma.jpg
sharma.jpg

विरार ः शिवसेनेला पाठींबा दिला नसल्याचे जाहीर करून आगरी सेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्धार केल्यामुळे तसेच नालासोपारातील जागेवर आगरी सेनेने आपला उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीने तयारी केल्याने चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत भर पडली आहे.तर आगरी सेनेकडून नालासोपारा मधून राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील हे निवडणुकीच्या मैदान उतरणार असल्याचे बोलले जात असून, याबाबत दोन दिवसात आगरी सेनेतर्फे घोषणा होणार आहे. 

शिवसेना-भाजपा युती होण्यापुर्वीच चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या उत्साही पी. एस. फाऊंडेशनने शर्मांची नालासोपारा विधानसभा क्षेत्रात प्रसिध्दी सुरु केली. त्यात उत्साही शिवसैनिकांनी भर टाकून  शर्मा यांची उमेदवारीही जाहीर करून भावी आमदार म्हणून शर्मा यांचा उल्लेख सुरु केला. दहीहंडी, गणेशोत्सव आणि इतर उत्सवात प्रदीप शर्मा यांची आपला माणूस म्हणून जोरदार प्रसिध्दी करण्यात आली.

दरम्यान, स्वागत मेळावा, कार्यकर्ता मेळाव्यातही शिवसेनेने शर्मा यांची उमेदवारी गृहीत धरून जोरदार स्वागत केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुभाष साटम, आगरी सेनेचे जनार्दन पाटील यांनीही प्रदीप शर्मा यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे बहुजन विकास आघाडी विरुध्द शर्मा आणि शर्मांना भाजप आणि आगरी सेनेचा पाठींबा असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता हे चित्र बदलले असून, शर्मा यांच्या अडचणीत भर पडली आहे.

दरम्यान, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंड करून लोकसभेची जागा शिवसेनेला दिल्यामुळे विधानसभेच्या जागेवर आपला दावा केला आहे. विधानसभेची जागाही शिवसेनेला दिल्यास आम्ही अपंग होवू असा संताप व्यक्त करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नालासोपारा लढवण्याचा ठराव केला आहे. हा ठराव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी वरिष्ठांना न सांगता आगरी सेनेचा पाठिंबा शिवसेनेला जाहीर केल्याने त्यांच्यावर  नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आगरी सेनेचे अध्यक्ष राजाराम साळवी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्य कार्यकारिणीने जनार्धन पाटील यांना कारणे दाखवा नोटीस काढली होती. त्यावर जनार्धन पाटील यांनी माफीनामा दिल्याचे समजते तर काल आगरी सेनेच्या झालेल्या बैठकीत निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभा करण्याचे ठरले आहे. त्या दृष्टीने आता मोर्चेबांधणी सुरु केली असून, नालासोपारामधून आगरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याने प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com