'प्रगती एक्‍स्प्रेस'चा अपघात टळला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

कामोठे (नवी मुंबई) - पुण्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या "प्रगती एक्‍स्प्रेस'च्या इंजिनमध्ये शनिवारी सकाळी झाडाची फांदी अडकली. मात्र, मोटरमनने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला.

कामोठे (नवी मुंबई) - पुण्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या "प्रगती एक्‍स्प्रेस'च्या इंजिनमध्ये शनिवारी सकाळी झाडाची फांदी अडकली. मात्र, मोटरमनने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला.

"प्रगती एक्‍स्प्रेस' कर्जत स्थानकातून सकाळी साडेनऊ वाजता निघाली. चौक रेल्वेस्थानक सोडल्यानंतर मोहपे स्थानकाच्या अलीकडे गाडी वेगात असताना रेल्वेमार्गालगत जांभळाच्या झाडाची रेल्वेमार्गावर पडलेली फांदी इंजिनमध्ये अडकली. त्यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवून गाडीचा वेग कमी करून गाडीवर ताबा मिळवला. या वेळी मोठा आवाज झाल्यामुळे अपघाताच्या शक्‍यतेने अनेक प्रवासी गाडीतून खाली उतरले. घडलेला प्रकार ध्यानात आल्यावर इंजिनमध्ये अडकलेली फांदी बाहेर काढली. या गोंधळात गाडीला 20 मिनिटांचा उशीर झाला, तर पनवेलकडे येणारी मनमाड-पुणे एक्‍स्प्रेस मोहपे स्थानकात थांबविण्यात आली होती, अशी माहिती रेल्वे प्रवासी रूपक पुरोहित यांनी दिली.

Web Title: pragati express