सुशांतच्या मुंबईतील प्रॉपर्टीसाठी घरच्यांनीच त्यावर दबाव टाकला का ?

सुमित बागुल
Tuesday, 6 October 2020

दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा तपास अजूनही सुरु आहे. जसजशी ही केस पुढे जातेय, तसतसे या केसमध्ये महत्त्वाचे खुलासे होताना पाहायला मिळतायत.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एम्सने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा अहवाल CBI ला पाठवलाय. या अहवालात सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आत्महत्याच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली, मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं बोललं गेलं.

दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा तपास अजूनही सुरु आहे. जसजशी ही केस पुढे जातेय, तसतसे या केसमध्ये महत्त्वाचे खुलासे होताना पाहायला मिळतायत. सोबतच नवनव्या मागण्या देखील पुढे येतायत. याचप्रकरणी आता शिवसेना नेत्याने नवीन शंका उपस्थित करत काही सवाल विचारलेत. 

ठाण्यातील शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नवी शंका उपस्थित केलीये. सुशांत सिंग राजपूत याच्या कुटुंबीयांनी त्याच्या संपत्तीसाठी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलंय का? असा सवाल प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलाय.

महत्त्वाची बातमी : मुंबई पोलिस आयुक्त बदनामी प्रकरणी सायबर सेलकडून दोन गुन्हे दाखल

महत्त्वाची बातमी : अनलॉकनंतर तळोजा MIDC तून पुन्हा प्रदूषण सुरू; श्वसन रोग, दमा आदी आजार बळावण्याची शक्यता
 

मुंबई पोलिसांनी जो तपास केला होता त्यामध्ये सुशांतची सख्खी बहीण आणि त्याचे कुटुंबीय दिल्लीतील डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन आधारे नशेची औषधे त्याला देत होते, असं प्रताप सरनाईक म्हणालेत. सोबतच सुशांतच्या घरच्यांची त्याच्या मुंबईतील  प्रॉपर्टीसाठी काही मागणी होती का ? ज्यावरून सुशांतला नैराश्य आलं आणि त्यांनी आत्महत्या केली. याबाबत तपासणीची मागणी प्रताप सरनाईक यांनी ट्विटरच्या माध्यमातुन केलीये. 

pratap sarnaik demands investigation in SSR death case and check intentions of family


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pratap sarnaik demands investigation in SSR death case and check intentions of family