'सुशांतप्रकरणी शिवसेनेवर आरोपांची राळ उडवणारे तोंडावर आपटले'; शिवसेना आमदाराची प्रतिक्रिया

तुषार सोनवणे
Sunday, 4 October 2020

एम्सच्या अहवालानंतर सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आणि सुशांतवर आरोप करणाऱ्यांवर आमदार प्रताप सरनाईक यांनी टीकास्त्र सोडले आहे

मुंबई - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर विविध चर्चांना उधान आले होते. मुंबई पोलिसांच्या चौकशीवर शंका घेत. अनेकांनी सीबीआयची मागणी केली होती. एम्सच्या अहवालानंतर सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आणि सुशांतवर आरोप करणाऱ्यांवर आमदार प्रताप सरनाईक यांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यासोबतच सरनाईक यांनी रिपब्लिक या खासगी वृत्तवाहिनीलाही लक्ष केले आहे.

नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! एक्‍सपायरी डेट विना मिठाई विक्री - 

सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी अनेकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर आक्षेप व्यक्त केला होता. याप्रकरणाची चौकशी न्यायालयाने सीबीआय कडे सोपवली. याच दरम्यान, एम्स ने सुशांतप्रकरणाचा अहवाल देत, त्याचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यावेळी शिवसेना आणि मुंबई पोलिसांना टीकेचे लक्ष करणाऱ्यांवर प्रताप सरनाईक यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट केले की, सुशांतच्या मृत्युनंतर शिवसेनेवर आरोपांची राळ उडवणारे एम्सच्या रिपोर्टमुळे आज तोंडावर आपटले आहेत. अर्णव व काही राजकीय नेत्यांच्या आरोपांना आम्ही वेळोवेळी उत्तरे दिलेली होती. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आरोप करताना यापुढे 100 वेळा विचार करा. अर्णव @republic  ऐकतोयेस ना?

या ट्विटमध्ये सरनाईक यांनी शिवसेनेवर आगपाघड करणाऱ्यांनातर खडेबोल सुनावलेच आहे, परंतु रिपब्लिक या वृत्तवाहिनीवरही टीका केली आहे. त्याच्या या ट्विटवर नेटकरी व्यक्त होत आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pratap Sarnaiks reaction to those who accused Shiv Sena in Sushant Singhs death case