आठवलेंवर हल्ला करणाऱ्याची ही आहे ओळख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्या प्रविण गोसावी नामक व्यक्ती हा गेले अनेक दिवस फेसबुकवर त्यांच्याबाबत उलटसुलट पोस्ट टाकत होता. प्रविण हा आठवले यांच्या विरोधात पोस्ट शेअर करत होता, मात्र त्यावेळी त्याच्या विरोधात कोणत्याही आरपीआय कार्यकर्त्यांनी किंवा नेत्याने तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे.

अंबरनाथ : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी रात्री अंबरनाथमध्ये हल्ला करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून, प्रविण गोसावी असे त्या तरुणाचे नाव आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्या प्रविण गोसावी नामक व्यक्ती हा गेले अनेक दिवस फेसबुकवर त्यांच्याबाबत उलटसुलट पोस्ट टाकत होता. प्रविण हा आठवले यांच्या विरोधात पोस्ट शेअर करत होता, मात्र त्यावेळी त्याच्या विरोधात कोणत्याही आरपीआय कार्यकर्त्यांनी किंवा नेत्याने तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे. आठवलेंच्या कार्यपद्धतीवर तो नाराज होता. तो काही दिवस आरपीआयच्या अंबरनाथच्या युवक आघाडीचा सचिव होता. दरम्यान त्याचे काही वाद झाल्याने त्याला पदावरून काढण्यात आले होते.

अंबरनाथमधील विमको नाका परिसरात नेताजी मैदानावर रिपाइंतर्फे संविधान गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आठवले शनिवारी अंबरनाथमध्ये आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर व्यासपीठावरून उतरत असताना एक तरुण धावत आठवलेंपर्यंत पोचला. कोणाला काही कळण्यापूर्वीच त्याने आठवलेंच्या कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्ते संतप्त झाले. आठवले यांना सावरल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो बेशुद्ध पडला.

तो आरपीआय कार्यकर्ता होता का? तो फेसबुकवर आठवले साहेबांबद्दल अनेक दिवस उलट सुलट पोस्ट टाकत होता? त्याला मारहाण करण्यात आली, असे अंबरनाथचे आरपीआय शहराध्यक्ष अजय जाधव यांनी सांगितले.

Web Title: Pravin Gosavi attacked Ramdas Athwale in Ambarnath