मुंबई शहरांत मान्सूनपूर्व सरींचा जोर 

मुंबई शहरांत मान्सूनपूर्व सरींचा जोर 

मुंबई -  वायू चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीपासून दूर गेले असले तरीही मान्सूनपूर्व सरींचा जोर किनारपट्टीवरील भागांवर आज (शुक्रवारीही) दिसून आला. दिवसा उकाडा आणि दुपानंतर मान्सूनपूर्व सरी असा दिनक्रम सध्या मुंबईतील वातावरणात दिसून येत आहे. 

 दुपारपासून मुंबईत मान्सूनपूर्व सरींना सुरुवात झाली. एखाददुसरी मोठी सरीचा जोर शहरभागांत जास्त दिसून आला. परिणामी, दिवसभरात कुलाबा केंद्रात सत्तावीस पूर्णांक सहा मिमी तर सांताक्रूझमध्ये सहा पूर्णांक सहा मिमी पावसाची नोंद झाली. सरींचे रात्रीपर्यंत बरसणे सुरुच होते. पावसाच्या बरसण्याने परतीच्या प्रवासाच्या चाकरमान्यांचा गोंधळ उडाला. वादळ मुंबईपासून दूर गेल्याने आता मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसणार नाही, या समजुतीने कित्येकांनी छत्री बाळगली नाही. त्यामुळे सरींचा वर्षाव होताच सायंकाळी मुंबईकरांनी दुकाने, उपहारगृहांचा आधार घेतला. कमाल तापमानात फारशी घट नोंदवली गेली नाही. कमाल तापमान 34.2 अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. हे तापमान सरासरीच्या एका अंशाने जास्त होते. किमान तापमानही 26.8 अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. उद्याही ढगाळ वातावऱण राहील, मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com