मोठी बातमी - मुंबईच्या लोकल ट्रेन्स, मेट्रो आणि बसेस आठवडाभरासाठी होणार बंद ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

मुंबई - जगभरात कोरोनाने हात पाय पसरलेत. अशात भारतात आणि त्यासोबत महाराष्ट्रावर कोरोनाचं मोठं संकट घोंगावतंय. याच पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधून मोठी बातमी समोर येतेय. कोरोनाला रोखण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारकडून वेगवान पावलं उचलली जातायत. मुंबईची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल ट्रेन प्रायोगिक तत्त्वावर म्हणजेच एक आठवड्यासाठी बंद करणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. याचसोबत मुंबईतील मेट्रो आणि बसेस देखील बंद करणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय.  

#COVID19 - कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !

आज सकाळीच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कॉर्पोरेट सेक्टर मधील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कॉर्पोरेट सेक्टर आणि खासगी कंपन्यांना कोरोनाबाबत माहिती देण्यात आली. अशात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील कॅबिनेट मिटिंग घेणार आहेत. या मिटिंग नंतर मुंबईतील लोकल ट्रेनबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. 

#COVID19 - १०० टक्के 'वर्क फ्रॉम होम'ला कॉर्पोरेट सेक्टरचा होकार; CSR फंडातून होणार सरकारला मदत

महाराष्ट्रात कोरोना सध्या दुसऱ्या स्टेजवर आहे. अशात जागतिक आकडेवारी पहिली तर तिसऱ्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमालीची वाढलेली पाहायला मिळालीये. अशात महाराष्ट्रातील कोरोना तिसऱ्या स्टेजवर जाऊ नये यासाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. अशात कोरोनाच्या संसर्गाची चेन तोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. म्हणूनच मुंबईतील सर्वात जास्त गर्दीची असणारी मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच मुंबईच्या लोकल ट्रेन्स या आठवड्याभरासाठी बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. 

as precaution government is planning to shut mumbai locals for 7 days sources

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: as precaution government is planning to shut mumbai locals for 7 days sources