लोकलमधून पडून गर्भवती जखमी 

लोकलमधून पडून गर्भवती जखमी 

मुंबई : धावत्या लोकलमधून पडून चार महिन्यांची गर्भवती जखमी झाल्याची घटना घडली आहे. पूजा स्वप्नील जगताप असे तिचे नाव आहे. तिच्यावर गोरेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोगेश्‍वरी पोलिस ठाण्याच्या महिला शिपाई प्रसंगावधनामुळे पूजाला जीवनदान मिळाले आहे. 

पूजा माहीम येथे खासगी कंपनीत काम करते. गोरेगाव ते माहीम असा पश्‍चिम रेल्वेच्या लोकलने ती नियमित प्रवास करते. बुधवारी सकाळी ती जलद लोकलने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान भोवळ आल्याने पूजा खाली कोसळली. हा प्रकार डब्यातील महिला शिपाई रूपाली मेजारी यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लोकलची साखळी खेचून लोकल थांबवली. त्यानंतर रूपाली मेजारी घटनास्थळी जाऊन जखमी रूपालीबाबत वांद्रे रेल्वे पोलिसांना माहिती दिली.

काही वेळात रेल्वे पोलिस पथक घटनास्थळी आले. त्यांनी पूजाला वांद्य्रातील भाभा रुग्णालयात दाखल केले. पूजाच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे. तिला पुढील उपचाराकरता गोरेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती सुधारत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com