"प्रसवपूर्व निदानतंत्र'च्या अध्यक्षपदी रहाटकर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई - महाराष्ट सरकारकडून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 2003 राज्य तपासणी व सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची निवड करण्यात आली आहे.

विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार डॉ. देवराव होळी, माजी न्यायाधीश ऊर्मिला जोशी, आमदार राहुल पाटील, आमदार शशिकांत खेडेकर, तसेच नगरविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.

Web Title: Prenatal diagnostic system chairman vijaya rahatkar