फौजदारीत तपास अधिकाऱ्यांची साक्षीला उपस्थिती बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई - फौजदारी प्रकरणांत महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवताना तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. याबाबतचे परिपत्रक पोलिस महासंचालकांनी जारी केल्याची माहिती सरकारने सत्र न्यायालयात दिली.

पोलिस तपासासाठी महत्त्वाचे प्रयोगशाळांचे तसेच हस्तरेखा तज्ज्ञांचे अहवाल येण्यास विलंब लागत असल्यामुळे आता हे कामही खासगी संस्थांमार्फत केले जाणार आहे. प्रादेशिक पातळीवर नांदेड आणि कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा अनुक्रमे 2015 आणि 2016 पासून सुरू झाल्या, असे सरकारने न्यायालयात सांगितले. ठाणे, रत्नागिरी, सोलापूर, धुळे, चंद्रपूर या ठिकाणी छोट्या प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. प्रशासकीय मान्यता मिळताच या प्रयोगशाळा सुरू होतील, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मानसशास्त्र, सायबर क्राईम अशा चाचण्यांसाठी विशिष्ट तंत्रज्ञान असलेली प्रयोगशाळा तयार केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत खटला चालवताना कुठल्याही स्वरूपाची अडचण येऊ नये, यासाठी गृहखात्यांतर्गत पोलिस दलाचे अत्याधुनिकीकरण सरकारने सुरू केले आहे. हा त्यातील एक भाग आहे, असे सरकारने न्यायालयात सांगितले.

Web Title: The presence of the investigating officers as witnesses binding