महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी आता समोर येतेय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आता राज्यपालांकडून आलेल्या शिफारसीवर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. 

भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींकडे याबाबतचा अहवाल पाठविला होता.  त्यांनी ट्विटरवरून याबाबतचे निवेदन देत घटनेनुसार राज्य चालविणे कठीण असल्याचे म्हटले आहे. राज्यातील कलम 356 लागू करण्याची स्थिती असल्याचेही राज्यापालांनी म्हटले होतं. त्यामुळे राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करेपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होणाऱ हे निश्चित मानण्यात येत होतं. 

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांची मुदत रात्री साडे आठ वाजता संपत आहे. त्यापूर्वीच राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती राम नाथ कोविन यांच्याकडून आता या शिफारसीवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची ही तिसरी वेळ आहे. 

Presidents Rule imposed in the state of Maharashtra

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Presidents Rule imposed in the state of Maharashtra