या पालकमंत्री कोकणासाठी निधी आणणार

माणगाव : पत्रकार परिषदेत माहिती देताना राज्यमंत्री अदिती तटकरे.
माणगाव : पत्रकार परिषदेत माहिती देताना राज्यमंत्री अदिती तटकरे.

माणगाव (वार्ताहर) : आज पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंती उत्सवाला हजेरी लावून मानवंदना दिली. एक राज्यमंत्री म्हणून आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन. उद्योग, क्रीडा युवक कल्याण, खनिकर्म माहिती व प्रसारण, राजशिष्टाचार, फलोत्पादन या सर्व खात्यांची जबाबदारी स्वीकारत जिल्ह्याला आणि कोकण विभागाला जास्तीत जास्त निधी प्राप्त करणार असल्याचे रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माणगाव येथे विश्रामगृहात पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्‍चितपणे पार पाडेन. या जिल्ह्याची मुलगी म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आहे. महाआघाडीच्या सर्व घटकांना एकत्रित घेऊन आपल्या जिल्ह्याचे प्रश्न येत्या पाच वर्षांत पूर्णत्वास नेण्याचा निश्‍चय असेल, असे प्रतिपादन तटकरे यांनी व्यक्‍त केले.

रायगड जिल्ह्यातील प्रश्नाबाबत पत्रकारांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, प्रलंबित प्रकल्पाबाबत काही दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतली आहे. सभागृहाच्या पहिल्याच दिवशी आमदार अनिकेत तटकरे व मी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आता रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. त्याबाबतचे निवेदनही प्राप्त झाले आहे. येत्या १० दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात रखडलेल्या प्रलंबित प्रकल्पासंदर्भात बैठक घेणार आहोत.

उपजिल्हा रुग्णालयाबाबत विचारणा केली असता, शासकीय रुग्णालयात नव्याने काही सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली जाईल. जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयात जी कमतरता जाणवते, त्याची माहिती मागणार असून, जी कमतरता उणीव भासते आणि रिक्त पदे आहेत, तेही भरण्यात येतील. गडकिल्ले, यात्रास्थळ, पर्यटन ठिकाणे या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपला आहे.

त्यासंबंधी येत्या दहा दिवसांत कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार आहोत. नाट्यगृहासाठी चार कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. त्यासाठी अजून निधीची गरज लागेल. तो आणायची जबाबदारीही सुनील तटकरे यांनी घेतलेली आहे. काही दिवसांपासून विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात ज्या घटना घडत आहेत, त्या ठिकाणी त्या मूलभूत सुविधांची गरज आहे. त्यानुसार एमआयडीसीच्या स्वतंत्र बैठकीत स्थानिक नेत्यांना घेऊन नागरिकांना सोबत घेऊन त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू.

या पत्रकार परिषदेप्रसंगी विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, उपसभापती राजेश पानावकर, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन अधिकारी, संगीता बक्कम आणि नगर पंचायत सर्व सदस्या या वेळी उपस्थित होत्या.

क्रीडा संकुलाबाबत अंदाजपत्रक लवकरच
क्रीडा संकुलाबाबत अंदाजपत्रक आठ दिवसांपूर्वी तयार केले आहे. येत्या महिनाभरात ते काम सुरू केले जाईल. प्रथम क्रीडासंकुलात ज्या दुरुस्तीची गरज आहे, त्या कामांना प्राधान्य देणार आहोत. त्यानंतर ज्या वाढीव कामांची गरज आहे, तेही योग्यरित्या केली जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com