पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणच्या दौऱ्यावर 

रविंद्र खरात 
सोमवार, 17 डिसेंबर 2018

कल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार (ता. 18) कल्याण मध्ये येणार असल्याने सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने ही पालिकाहद्दीत दर मंगळवारी होणारी पाणी कपात रद्द करत पाणी पुरवठा सुरू ठेवणार असल्याने कल्याण डोंबिवलीकराना मोठा दिलासा मिळणार आहे.

कल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार (ता. 18) कल्याण मध्ये येणार असल्याने सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने ही पालिकाहद्दीत दर मंगळवारी होणारी पाणी कपात रद्द करत पाणी पुरवठा सुरू ठेवणार असल्याने कल्याण डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खड्डेमय रस्ते दुरुस्त बाबत आंदोलन होऊन ही कामे मार्गी लागत नव्हते. कल्याण पश्चिम मधील डंपिंगचा उग्र वास आणि ती आग अनेक दिवस विझत नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण दौऱ्यामुळे सभा आणि हेलिपॅड परिसर चकाचक झाला असून डंपिंगवर आग लागू नये म्हणून चक्क सुरक्षा रक्षक नेमले आहेत. तसेच दुर्गंध येऊ नये म्हणून उपाय योजना सुरू आहे. एकीकडे सर्व सामान्य आरडाओरडा करून ही सरकारी यंत्रणा काम करत नाही.  मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण मध्ये येणार असल्याने रस्ते, फुटपाथ चकाचक झाले आहे. 

मंगळवारी पाणी येणार ...शुक्रवारी पाणी बंद राहणार ...
दर मंगळवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत पाणी कपातीच्या नावाखाली पाणी बंद असते.  मात्र मोदींच्या कल्याणदौरयामुळे त्या दिवशी पालिकेने पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात शुक्रवार (ता 21) पाणी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिका पाणी पुरवठा विभागाने जाहीर केले आहे. पाणी पुरवठा बंद राहिल्यास नागरिक आंदोलन करू नये म्हणून पाणी पुरवठा करणार असल्याचे समजते . ''मोदी एक दिवस कल्याणमध्ये येणार असतील आणि शहरातील रस्ते चकाचक, वाहतूक कोंडीमुक्त रस्ते होणार, पाणी पुरवठा होणार असेल तर  त्यांनी कल्याण शहरात दर महिन्याला यावे.'',अशी मागणी कल्याण डोंबिवलीकर करत आहेत .

Web Title: Prime Minister Narendra Modi visits the kalyan