प्रिन्स मृत्यू प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई करा

प्रिन्स मृत्यू प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई, ता. २३ : हृदयविकारावरील उपचारासाठी उत्तर प्रदेशातून येऊन केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या प्रिन्स राजभर या बालकाचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने आज केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांची भेट घेतली. 

उत्तर प्रदेशातील प्रिन्स राजभर या बालकावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. बालकांच्या अतिदक्षता विभागात ७ नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने प्रिन्स गंभीर जखमी झाला होता. त्याचा डावा हात भाजल्यामुळे तो शस्त्रक्रिया करून काढण्यात आला होता; मात्र गुरुवारी (ता. २१) मध्यरात्री प्रिन्सचा हृदयाविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे प्रिन्सचा मृत्यू झाल्याचे सांगत अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केला. प्रिन्सच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 
या दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालयाची बदनामी झाली असल्याचेही ठाकरे म्हणाले.

प्रिन्सच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये नुकसानभरपाई देऊन पालिका किंवा रुग्णालय प्रशासन आपली ही जबाबदारी झटकू शकत नाही, असेही ते म्हणाले. या वेळी ठाकरे यांच्यासोबत संदीप देशपांडे आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com