खासगी बसचालकांची मनमानी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

तुर्भे - ठाणे-बेलापूर आणि सायन-पनवेल महामार्गावर बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहरातील रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी, पुलाखाली आणि बसथांब्यावर खासगी वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीत अडथळा येऊन वाहतूक कोंडी तर होतेच, परंतु बसथांब्यावरही वाहने उभी केली जात असल्यामुळे प्रवाशांना बसमधून उतरताना आणि चढताना कसरत करावी लागते. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे आरटीओ आणि वाहतूक शाखा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सायन-पनवेल मार्गावर वाशी, सानपाडा आणि ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे पोलिस ठाणे, नेरूळ एलपी उड्डाणपूल, सीबीडी उड्डाणपूल आदी ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सच्या बस आणि इतर खासगी वाहने उभी केली जातात. येथे बसथांबेही आहेत. तेथेही ही वाहने उभी असतात. वसाहतीमधील रस्त्यांवर प्रवेशबंदी असतानाही खासगी ट्रॅव्हल्सचालक नियम धाब्यावर बसवतात. तुर्भे पोलिस ठाण्याजवळच्या मुख्य रस्त्यावर सायंकाळी ६ नंतर खासगी ट्रॅव्हल्सच्या बसच्या रांगा लागतात. रात्री ११ पर्यंत येथे बसच्या रांगा असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका इतर वाहनचालक आणि प्रवाशांना बसतो. वसाहतींमधील रस्ते त्यांना जणू आंदणच दिले आहेत. मुंबई आणि ठाणे येथून पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर आदी ठिकाणी वाहने जातात. सायंकाळनंतर या भागांत जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढते. त्यात खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचे प्रमाण अधिक असते. या सर्वच खासगी बस ठाणे-बेलापूर किंवा सायन-पनवेल मार्गावरून धावतात.

बेकायदा बसथांबे
मुंबई किंवा ठाणे येथून प्रवासी घेऊन निघाल्यानंतर या बस नवी मुंबईत मोक्‍याच्या ठिकाणी थांबवल्या जातात. यात ठाणे-बेलापूरवरील रबाळे तलाव, कोपरखैरणे रेल्वेस्थानक आणि सायन-पनवेल मार्गावर वाशी पूल, सानपाडा पुलाखाली, नेरूळ आणि सीबीडी येथे या बस उभ्या असतात. या सर्व ठिकाणी एकाच वेळी पाच ते १० खासगी बस थांबत असल्यामुळे वाहतुकीत अडथळे येतात. विशेष म्हणजे तेथे एसटीचे बस थांबे आहेत. 

Web Title: Private bus drivers' arbitrariness