खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांवर उपासमारीची वेळ, क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी

खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांवर उपासमारीची वेळ, क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी

मुंबई: कोरोना संकटामुळे राज्यातील लहान आणि मध्यम कोचिंग क्‍लासेस साडे सहा महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे राज्यातील सुमारे एक लाख क्‍लासेस आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहेत. राज्य सरकारने अद्याप क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी न दिल्याने संचालक आणि त्यांच्या कुटुंबियातील पाच लाख सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोचिंग क्‍लासेस टिचर्स फेडरेशन ऍण्ड सोशल फोरमचे राज्याध्यक्ष प्रा.बंडोपंत भुयार यांनी केली आहे.

अनलॉकनुसार राज्य सरकार लॉकडाऊनचे नियम शिथील करत आहे. त्यानुसार विविध क्षेत्रांना सूट देण्यात आली आहे. मात्र शाळा आणि महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. यामुळे राज्यातील खासगी क्‍लासेस चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. क्‍लासेसना परवानगी देण्यात येत नसल्याने सरकारची शिक्षणाच्या बाबतीत अनास्था असल्याचे दिसत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. त्यामुळे त्यांना ऑफलाईन शिक्षणाची आवश्‍यकता आहे. हे लक्षात घेऊन सरकारने काही अटी घालून खासगी क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भुयार यांनी केली आहे.

पालकांच्या परवानगीने आणि विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार फिजिकल डिस्टंसिगचे सर्व नियम पाळून कमीत कमी विद्यार्थी संख्येसाठी किंवा एका बेंचवर एक विद्यार्थी बसण्यास सरकारने परवनागी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Private coaching classes owners Request permission start classes

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com