देशभरातील खासगी रुग्णालये आज ठप्प 

hospital
hospital

मुंबई : कोलकाता येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणी विरोधात सोमवारी देशभरातील खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग आणि तर रेडिओलॉजी विभाग तसेच मुंबईतील दवाखाने बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे उद्या सार्वजनिक रुग्णालयांवर ताण पडण्याची शक्यता आहे. 

देशपातळीवर इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी रुग्णालयातील अडीच लाख तर राज्यातील पंचेचाळीस हजार डॉक्टर्स बाह्यरुग्ण विभागात सहभागी होणार नाही. वार्ड आणि आपत्कालीन सेवेत डॉक्टर्स सहभागी राहतील. केंद्रात डॉक्टरांच्या हल्ल्याविरोधात कायदा कडक व्हावा आणि डॉक्टरांना सेवाकाळात सुरक्षा मिळावी यासाठी सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांतील विविध संघटना एकटवल्या आहेत.  राज्यांत इंडियन रेडिओलॉजिकल ऍण्ड ईमेजिंग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेकडून दोन दिवस रेडिओलॉजी सेवा बंद ठेवली जाईल. या दिवसांत सोनोग्राफी , सिटीस्कॅन , एमआरआय आणि एक्सरे या सुविधा मिळणार नाही. मुंबईतील दवाखाने बंद ठेवण्याचा.मुंबई  असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टण्ट या संघटनेने घेतला आहे. सरकारी रुग्णालये सुरू असली तरीही निवासी डॉक्टर्स काळ्या फिती लावून कामे करतील. 

हल्ला होऊन पाच दिवस उलटले तरीही कोलकाता येथील कनिष्ठ डॉक्टराच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. अजूनही त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील चोवीस तास त्याच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे डॉक्टरांचे आंदोलन चिघालण्याचीही शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com