लॉकडाऊनमुळे खासगी ITI मधील कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ; केंद्र आणि राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी..

LOCKDOWN
LOCKDOWN

मुंबई: लॉकडाउनच्या कालावधीत राज्यातील खाजगी आयटीआयमधील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क अद्यापही संस्थाचालकांना मिळाले नसल्याने संस्थाचालकांनी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेने केली आहे.

राज्यातील खाजगी आयटीआयमधील विद्यार्थ्यांना 80 टक्के फी सरकारकडून देण्यात येणार होती. संस्था चालकांनी विद्यार्थांना सरकारच्या आदेशाप्रमाणे प्रवेश दिले. मात्र आजवर या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची रक्कम अद्यापही संस्थाचालकांना मिळालेली नाही. यामुळे राज्यातील सुमारे 50 टक्के आयटीआयमधील कर्मचाऱ्यांचे पगार संस्थाचालकांनी रोखले आहेत. 

यामुळे कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातच बिहार व केरळ मधील खाजगी आयटीआय संघटनेने केंद्राकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना विशेष पॅकेज देण्याबाबत मागणी केली आहे. त्यावर केंद्राने बिहार राज्य सरकारला याबाबत अहवाल देण्याची सूचना केली आहे. त्या अहवालाच्या आधारे केंद्र व राज्य सरकार एकूण फीच्या 50 टक्के रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्याच्या विचारात आहे. 

त्या दृष्टीने राज्य सरकारने केंद्राकडे आर्थिक पॅकेजची मागणी करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी केली राज्य सरकारकडे केली आहे .याबाबत त्यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आयुक्त व संचालक यांच्याही चर्चा केली आहे. तसेच त्यांनी केंद्राकडे असा प्रस्ताव पाठवावा अशी विनंती केली आहे.

private ITI employees not getting their salaries due to lockdown read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com