esakal | कॉन्स्टेबलसाठी लाच घेतांना खाजगी व्यक्तीला अटक पालघर
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड पोलीस

कॉन्स्टेबलसाठी लाच घेतांना खाजगी व्यक्तीला अटक पालघर

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने गुन्ह्यात अटक न व्हावी म्हणून मदत करतो यासाठी आरोपीच्या चालकाकडे लाच मागीतिली जी स्विकारताना पोलिसासह एका खाजगी व्यक्तीला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

विक्रमगड पोलीस ठाण्यात एका व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल होता ज्यात अटक होऊ नये यासाठी मदत करतो म्हणून पोलीस कॉन्स्टेबल अशोक अनंता वाघ याने आरोपीच्या चालकाकडे 70 हजारांची लाच मागितली. पोलिसांचा जाच वाढू लागल्याने अखेर तक्रारदार यांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली.

एसीबीने तातडीने याबाबत कॉन्स्टेबलकडे शहानिशा करून 70 हजारांची लाच स्विकारताना हृषीकेश ढोन्नर या खाजगी इसमास सोमवारी रात्री 11.15 च्या सुमारास रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलीस हवालदार नितीन पागधरे, पोलीस नाईक संजय सुतार, दिपक सुमडा, नवनाथ भगत आदी सहभागी होते.

loading image
go to top