BMC : केईएम रुग्णालयात लवकरच खासगी ओपीडी; वाचा सविस्तर

तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार उपचार
kem hospital
kem hospitalsakal media

मुंबई : सर्व काही नियोजनानुसार झाले तर महापालिकेच्या (BMC) केईएम रुग्णालयात (KEM Hospital) लवकरच खासगी ओपीडी (Private OPD) सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत एखाद्या रुग्णाला उपचारासाठी (Patients treatment from experience doctor) पैसे खर्च करून मुंबई महापालिकेच्या अनुभवी डॉक्टरांकडून उपचार घ्यायचे असतील, तर त्यांना या ओपीडीचा लाभ घेता येणार आहे. महानगरपालिका रुग्णालये (BMC Hospitals) आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical college) काम करणारे डॉक्टर आशावादी आणि अत्यंत अनुभवी आहेत. इतर जिल्ह्यांतून आणि राज्यातील लोक उपचारासाठी मुंबईत येतात. (Private OPD in mumbai kem hospital soon)

kem hospital
राज्यात ओमिक्रॉनच्या नव्या दोन रुग्णांची भर; रुग्णसंख्या शंभरी पार

महापालिकेच्या डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी अनेक जण पैसे द्यायलाही तयार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या सूचनाही अनेक रुग्ण आणि इतर घटकांकडून महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. हे पाहता आता या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा विचार महापालिका करत आहे. प्राथमिक स्तरावर प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प महापालिकेच्या केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास महापालिकेच्या नायर आणि सायन रुग्णालयात खासगी ओपीडी सुरू करण्यात येणार आहे.

10% खाटा राखीव

वाडिया, टाटा रुग्णालयात ज्याप्रमाणे खासगी आणि सरकारी उपचार घेण्याचा पर्याय आहे, त्याचप्रमाणे महापालिकेच्या रुग्णालयातही हा पर्याय उपलब्ध होणार आहे. केईएम रुग्णालयातील खासगी ओपीडी व्यतिरिक्त, एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा खासगीसाठी राखीव असतील.

"सध्या आम्ही ओपीडी सुरू करण्याचा विचार करत आहोत. सर्व काही सुरळीत राहिल्यास येत्या वर्षभरात ही सेवा सुरू होईल. ही सेवा सुरू झाल्यापासून मोफत सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. महापालिकेच्या रुग्णालयांवरील लोकांचा विश्वास वाढेल आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी आम्ही मदत करू. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत महापालिकेच्या रुग्णालयात देण्यात येणारी सुविधा परवडणाऱ्या दरात असेल."

- सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com