ज्युनिअर कॉलेजमधील वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मिटला

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 5 जुलै 2018

मुंबई : आमदार कपिल पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषद नियम 93 अन्वये 2003 ते 2011 पर्यंत मंजूर झालेल्या ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाबाबत सूचना मांडली होती. 

मुंबई : आमदार कपिल पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषद नियम 93 अन्वये 2003 ते 2011 पर्यंत मंजूर झालेल्या ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाबाबत सूचना मांडली होती. 

आज नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाबाबत आमदार कपिल पाटील यांच्या 93  सूचनेनुसार पुरवणी मागणी मंजूर झाली आहे. त्यामुळे  त्या 171 ज्युनिअर कॉलेजमधील वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या ज्युनिअर कॉलेजमधील 171 वाढीव पदांवरील शिक्षकांना न्याय मिळाल्याबद्दल शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिटचे प्रा.शरद गिरमकर यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शासनाचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने शालार्थ वेतनप्रणाली त्वरित कार्यान्वित करावी,वैयक्तिक मान्यता मिळालेल्या शिक्षकांना 18.5.20 18 च्या जी आर नुसार त्वरित ऑफलाईन पद्धतीने  वेतन अदा करावे आणि इतर प्रलंबित न्याय्य मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात अशी अपेक्षा प्रो. गिरमकर यांनी व्यक्त केली.

Web Title: problem solve of the salary on junior college teachers