प्राध्यापकांना रेल्वे, ‘बेस्ट’ प्रवासात सवलत द्या!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रेल्वे तसेच बेस्ट बसच्या भाड्यामध्ये सवलत देण्यात येते. शिक्षक, प्राध्यापकांनाही ही सवलत मिळावी, यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी युवा सेनेने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू विष्णू मगरे यांच्याकडे केली आहे.

प्राध्यापक विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देण्याचे काम करत नाहीत. निवडणूक ड्युटी, मतदार नोंदणी तसेच सरकारच्या विविध सामाजिक उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे प्राध्यापकांना शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणे बस आणि रेल्वे प्रवासात सवलत देण्यासाठी विद्यापीठाने संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठाकडे पत्राद्वारे केली आहे. या मुद्द्यावर या सदस्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याशीही चर्चा केली. या शिष्टमंडळात सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, वैभव थोरात, राजन कोळबेकर, मिलिंद साटम, डॉ. सुप्रिया करंडे यांचा समावेश होता.

Web Title: professor railway best journey concession