धक्कादायक ! अल्पवयीन मुलांकडून प्रतिबंधात्मक पदार्थांची विक्री, पोलिसांच्या नजरेत धुळफेक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 मे 2020

लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा देणारे व्यवसाय वगळता इतर व्यवसाय बंद आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मद्यविक्रीची दुकाने, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे पान शॉपही बंद आहेत.

पनवेल : लॉकडाऊनमध्ये सिगारेट, तंबाखू, गुटखा, तसेच मद्यविक्री वाहतुकीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात आहे. पैशांसाठी अनेक अल्पवयीन मुलेही बंदी असलेल्या पदार्थांची विक्री करतानाचे चित्र पनवेल परिसरात पाहायला मिळत आहे.

मोठी बातमी : 'या' तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार विधान परिषद आमदार...

लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा देणारे व्यवसाय वगळता इतर व्यवसाय बंद आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मद्यविक्रीची दुकाने, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे पान शॉपही बंद आहेत. यामुळे मद्यपी आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याची सवय असलेले अडचणीत सापडले आहेत. अशा लोकांच्या अडचणीचा फायदा उचलण्यासाठी अनेक भागांत अल्पवयीन मुलांची टोळी सक्रिय झाली आहे. कमी वय असल्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय येत नाही. 

हे ही वाचा : सोशल मीडियावर ट्रेंडिंग 'स्मायली' काढतेय भाजप नेत्यांना चिमटे; पण ही स्मायली आहे तरी कोण ?

मोठ्या व्यापाऱ्यांकडून मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, गुटखा, तंबाखू, तसेच इतर बंदी असलेले पदार्थ खरेदी करून गरजवंतांना ही मुले जादा भावात विक्री करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे सायंकाळी 5 नंतर औषधाची दुकाने वगळता इतर आस्थापने बंद ठेवण्याच्या; तसेच घराबाहेर न पडण्याच्या सूचना असतानाही अल्पवयीन मुलांचा सर्वत्र वावर असल्याचे दिसून येत आहे.

नक्की वाचा : "विवाह संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्या आल्या लगेचच"; या लग्नाची आहे जोरदार चर्चा...

अत्यावश्यक सेवा योग्यरीतीने पुरवण्याबाबत आम्ही प्राथमिकता देत आहोत. मात्र, बंदी असलेल्या पदार्थांच्या विक्रीबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करणे अपेक्षित आहे.
- सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली

 Prohibited items for sale by minors, read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prohibited items for sale by minors, read full story